तांदूळाने भरलेला ट्रक रस्त्याबाहेर; सुदैवाने जीवितहानी टळली वडगाव फाट्याजवळ भीषण अपघात.!!!
सुदैवाने जीवितहानी टळली; ट्रकचे मोठे नुकसान
तांदूळाने भरलेला ट्रक रस्त्याबाहेर; सुदैवाने जीवितहानी टळली वडगाव फाट्याजवळ भीषण अपघात.!!!

भडगाव प्रतिनिधी :-
वरखेडी येथून गांधीधामकडे निघालेला तांदूळाने भरलेला GJ-12 BY-4092 क्रमांकाचा सोळा-टायरी ट्रक आज दिनांक 16 ऑक्टोबर गुरुवारी रोजी नागपूर–मुंबई राष्ट्रीय महामार्ग (NH-753J) वर वडगाव फाट्याजवळ अपघातग्रस्त झाला. अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याबाहेर गेले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघातात ट्रक महामार्गाच्या कडेला खोल खड्यात घसरला. जोरदार आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली.
अपघाताची माहिती मिळताच भडगाव पोलिस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. घटनेचा पुढील तपास भडगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
सुदैवाने या अपघातात ट्रकचालकचा जीव वाचला असला तरी ट्रकचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.