कासोद्यात पोलिसांची सट्टा-जुगारावर धडक कारवाई
कासोदा (ता. एरंडोल) – दि. 12 ऑगस्ट रोजी कासोदा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सट्टा-जुगारावर धडक कारवाई करत समाधान संतोष चौधरी (रा. कासोदा) यास अटक करून रोकड, मोबाईल व जुगार साहित्य जप्त केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोना नरेंद्र गजरे, पोना समाधान तोंडे, पोना निलेश गायकवाड यांचे पथकाने जुम्मा मशिदीजवळील आशिष जनरल स्टोअर समोर छापा टाकला. यावेळी समाधान संतोष चौधरी याच्या ताब्यातून 5 हजार रुपये रोकड, दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन व सट्टा-जुगाराची साधने मिळून आली.
या प्रकरणी पोना समाधान तोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा पोलिस ठाण्यात सीसीटीएनएस क्र.119/2025 अन्वये महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.