नगरदेवळा येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन.!!!
पाचोरा प्रतिनिधी :–
ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे यावर्षीचा स्वातंत्र्यदिन अनन्यसाधारण ठरला. त्यानिमित्त नगरदेवळा येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सकाळी शासकीय ध्वजारोहणानंतर शहीद भैय्यासाहेब बागुल स्मारक येथे माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शहीद भैय्यासाहेब बागुल यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले तसेच वीरमाता ग.भा. तुळसाबाई बागुल यांचा साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. गावातील व परिसरातील सर्व आजी-माजी सैनिक बांधवांचा भारतीय जनता पार्टी पाचोरा तालुक्याच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात निवृत्त सैनिक व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला भगिनी, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यानंतर तिरंगा रॅलीला प्रारंभ झाला. रॅली बसस्टॅन्ड, बाजार चौक, महादेव मंदिर, वाणी गल्ली, तेली मंगल कार्यालय मार्गे सरदार के.एस. पवार विद्यालय प्रांगणात समारोप झाला. रॅलीमध्ये आजी-माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व ऐ.टी. गुजराती विद्यालयातील विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.
कार्यक्रमाचे आयोजन निवृत्त सैनिक अधिकारी ज्ञानेश्वर बापू महाजन, दिलीप आप्पा महाजन तसेच ऐ.टी. गुजराती विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी केले. रॅली यशस्वी करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजन समितीचे अध्यक्ष गोविंद भाऊ शेलार यांनी सर्वांचे आभार मानले.