गोंडगाव विदयालयात स्वातंञ्य दिन उत्साहात साजरा.!!!

0 109

गोंडगाव विदयालयात स्वातंञ्य दिन उत्साहात साजरा.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयात १५ आॅगष्ट स्वातंञ्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विदयालयात ध्वजारोहण मुख्याध्यापक आदरणीय बापुसो, श्री. बी. जी. ननावरे यांच्या हस्ते करण्यात आले. व ध्वजाची पुजा करुन नारळ फोडण्यात आले. यावेळी ध्वजास मानवंदना व पथसंचलन तसेच तंबाखु मुक्त शपथ विदयार्थ्यांना श्री. क्रिडाशिक्षक श्री. एस. डी. चौधरी यांनी दिली. त्यानंतर गावातुन वाजत गाजत विदयार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी विदयार्थ्यांनी भारत मातेच्या घोषणा दिल्या. विदयार्थीनींनी कलशधारी व कुंडींमध्ये लावलेले झाडे, वृक्षारोपण दिंडी, तिरंगी झेंडे, घोषणांचे फलक, लेझीम पथकातील विदयार्थीनींनी भगवे फेटे बांधलेले होते. या प्रभात फेरीत खास आकर्षण ठरले. यातुन झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश दिला. प्रभात फेरी गावात निघाल्यानंतर विदयालयात समारोप झाला. शासनाच्या आदेशानुसार यावेळी विदयार्थ्यांनी कवायत, लेझीम पथकातुन कला सादर केली. व विदयार्थ्यांची चिञकला स्पर्धा घेण्यात आली. यावेळी विदयालयात विदयार्थ्यांना गोळया वाटप करण्यात आल्या. विदयालयात संपुर्ण फलक रंगीबेरंगी खडुने रंगविण्यात आल्याने खास आकर्षण ठरले.

या कार्यक्रमास विदयालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी. जी. ननावरे, श्री.सी. एस. सोन्नीस, श्री. एस. डी. चौधरी, श्री. आर. एस. देवकर, श्री. व्हि. ए. पाटील, श्री. एस. वाय. पाटील, श्री. पी. व्हि. सोळंके, श्री. बी. डी. बोरसे, श्री. एस. जी. आमले, श्री. आर. एस. सैंदाणे, श्री. एस. आर. महाजन, श्री. एन. ए. मोरे, श्री. पी. जे. देशमुख, श्री. एस. जी. भोपे, श्री. ए. एम. परदेशी, श्री. एस. एल. मोरे, श्री. व्हि. एम. जाधव यांचेसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बंधु, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

तसेच हर घर तिरंगा या शासनाच्या आदेशानुसार विदयालयात दररोज ३ दिवसापासुन ध्वजारोहण करण्यात आले. तसेच दि. १४ रोजी शुक्रवारी गावातुन विदयालयातील विदयार्थ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली. विदयालयामार्फत सध्या विविध उपक्रमांचे चांगले आणि उत्कृष्ट आयोजन विदयालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी. जी. ननावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी घेण्याचे सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!