लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर संगीतमय कवायत सादर केली. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी सुरेख नृत्यविष्कार सादर केला. मंत्रालयातील उत्कृष्ट अधिकारी सचिव श्री प्रशांत विनायकराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे, प्राचार्या वैशाली पाटील व प्रतिष्ठित नागरिक सदर प्रसंगी उपस्थित होते. इयत्ता चौथीची विद्यार्थिनी मनस्वी अभिजीत सिसोदे, तुषार गांगुर्डे, सेजल साळुंखे या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर विचार व्यक्त केले. शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सैनिकांचा वेश परिधान केला होता. शालेय परिसरात सुंदर रांगोळ्या, विद्यार्थ्यांच्या हातात तिरंगा मनात राष्ट्रभक्ती असा सुंदर कार्यक्रम साजरा झाला. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदर Ncc कवायत सादर केली.शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला. शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.