भडगाव अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी :–
भडगाव अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेच शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी, शिक्षक, पालक व स्थानिक नागरिकांची गर्दी उसळली होती.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे शिपाई श्री. इसहाक मलिक यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. ध्वज सलामीसह राष्ट्रगीताच्या गजरात संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते, कविता, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
विद्यार्थ्यांनी “स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारकांचे योगदान” व “एकतेतून सामर्थ्य” या विषयांवरील नाटिका सादर करून स्वातंत्र्याचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित केले. शाळेच्या मुलींनी दिलेल्या प्रात्यक्षिकांमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
प्राचार्यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्याचा इतिहास, त्यामागील बलिदान आणि आजच्या तरुण पिढीची जबाबदारी यावर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना देशभक्ती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुणे, शिक्षक व विद्यार्थ्यांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले. संपूर्ण शाळा परिसरात “इन्कलाब जिंदाबाद आणि “जय हिंद” या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले.