वाडे येथे तिरंगा रॅली याञेने जागली देशभक्ती.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
सीमेच्या संरक्षणासाठी अहोराञ आपल्या जीवाची बाजी लावणार्या जवानांच्या सन्मानार्थ व आॅपरेशन सिंदुरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ व हर घर तिरंगा अभियानांतर्गत भडगाव तालुक्यातील वाडे येथे गावातुन दि. १४ रोजी गुरुवारी सकाळी तिरंगा रॅली याञा काढण्यात आली. या रॅलीत नागरीक, माध्यमिक विदयालय व इंग्लीश मेडीयम स्कुलचे विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने सहभागी होते. याञामुळे देशभक्ती जागल्याचा उत्साह दिसुन आला. या रॅली याञेस उत्सफुर्त तरुण, नागरीकांचा सहभाग लाभला. रॅली याञेचा शुभारंभ माध्यमिक विदयालयापासुन झाला. गावातुन ढोलताशाच्या गजरात तिरंगा रॅली याञा काढण्यात आली. या तिरंगा रॅली याञेत आजी माजी सैनिक, नागरीक, तरुण मंडळी, विदयार्थी, विदयार्थीनी, शिक्षक मोठया संख्येने सहभागी होते