वाकमध्ये मध्यरात्री महसूल विभागाचा छापा; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त.!!!

0 111

वाकमध्ये मध्यरात्री महसूल विभागाचा छापा; अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील वाक गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाने मध्यरात्री छापा टाकत कारवाई केली आहे. ही कारवाई सोमवार, १३ ऑगस्ट रोजी करण्यात आली. जप्त केलेला ट्रॅक्टर भडगाव येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आला असून, संबंधित वाहनावर लवकरच दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभागाचे पथक गिरणा नदीपात्र परिसरात गस्त घालत असताना वाळूने भरलेला ट्रॅक्टर आढळून आला. वाहन चालकाकडे कोणतीही वैध परवानगी नसल्याने महसूल अधिकाऱ्यांनी तत्काळ वाहन जप्त केले. या कारवाईमुळे परिसरातील वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

या मोहिमेत तहसीलदार शीतल सोलाट, नायब तहसीलदार सुधीर सोनवणे, ग्राम महसूल अधिकारी संजय सोनवणे, अविनाश जंजाळे, समाधान हुलहुले, शुभम चोपडा, प्रशांत कुंभारे, ग्राम महसूल सेवक समाधान माळी, किरण मोरे, नितीन मोरे, विशाल सूर्यवंशी आणि चालक लोकेश वाघ यांचा सहभाग होता.

स्थानिक शेतकऱ्यांनी महसूल विभागाच्या या कारवाईचे स्वागत केले असून, वाक येथील गिरणा नदीपात्रातून पाचोरा, पारोळा, धुळे आदी भागांतून येणारे डंपर व ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची तक्रार त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पोलिस व महसूल विभागाने या भागात सतत गस्त ठेवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या डंपर आणि ट्रॅक्टर आढळल्यास कठोरात कठोर कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!