जळगावसामाजिक

जावळे येथे झाले वृक्षारोपण. २०० लावली झाडे.

जावळे येथे झाले वृक्षारोपण. २०० लावली झाडे.

चाळीसगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील जावळे येथे गावालगत परदेशी मंगल कार्यालयाच्या नियोजीत जागेवर चाळीसगाव येथील परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळाच्या पदाधिकार्यांच्या हस्ते विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली. हा छोटेखानी वृक्षलागवडीचा कार्यक्रम दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता आयोजीत करण्यात आला होता. जावळे येथील रहिवाशी व

परदेशी समाजातील दानशुर भगवान चञु परदेशी व त्यांचे कुटुंबियांनी ५६ आर जमिन विना मोबदला समाजाला दान दिलेली आहे. याच जागेवर समाजाचे मंगल कार्यालयाचे उभारणीचे आयोजन सुरु आहे. या जागेवर पामसह जवळपास २०० झाडांची लागवड करण्यात आली. या वृक्षांमुळे पुढे या भागात हिरवळीने निसर्ग सौंदर्य वाढणार आहे.

यावेळी चाळीसगाव येथील परदेशी राजपुत समाज उन्नती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी, अध्यक्ष भरतसिंग देवचंद छानवाळ, उपाध्यक्षा मथुराबाई भगवान परदेशी, संचालक सुभाष मन्नु महाजन, भगवान रघुविरसिंग परदेशी, तसेच भगवान चञु परदेशी जावळे , गोरख चञु परदेशी जावळे, कन्नड शिवसेना तालुका प्रमुख संजय राजपुत , सुनिल परदेशी जावळे, बाबुलाल परदेशी वडगाव यांचेसह समाजबांधव उपस्थित होते.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!