रक्षाबंधनाच्या दिवस ठरला काळा दिवस ; ४ अपघात,१२ जखमी.!!!

(पारोळा तालुक्यातील घटना)

0 150

रक्षाबंधनाच्या दिवस ठरला काळा दिवस ; ४ अपघात,१२ जखमी

(पारोळा तालुक्यातील घटना)

पारोळा प्रतिनिधी :-

पारोळा – तालुक्यातील म्हसवे,कामतवाडी,सार्वे व कजगाव रोडावर असे चार वेगवेगळ्या झालेल्या अपघातात १२ जण जखमी झाल्याची घटना आज रक्षाबंधन दिनी घडली आहे.

आज शनिवारी दुपारी एकच्या सुमारास म्हसवे फाट्याजवळ दोन मोटरसायकलींच्या धडकेत

अश्विनी राजेंद्र पाटील (२२), शिव सुनिल तनेजा (१८), गौरव गोविंदा गादरी (१८), प्रभाकर रूपलाल पाटील (६०) प्रणित मनोज पवार (४५),प्रतीक अशोक बडगुजर (३०) सर्व राहणार पारोळा हे जखमी झालेत.तसेच कामतवाडी फाट्याजवळ मोटरसायकल घसरून त्यात सुंदर लालजी चपके (५०), दत्तू दगडू बिरार (८८) राहणार चांदवड तर सरदार सेगल बारेला (४०,एम पी) हे जखमी झालेत.तसेच दुपारी पाचच्या सुमारास सार्वे गावाजवळ मोटरसायलीचा समोर कुत्रा आडवा आल्याने त्यात रामकृष्ण ईश्वर पाटील (३०) व जगदीश सिताराम पाटील (३०) राहणार फुलपाट ता.धरणगाव हे जखमी झालेत.जखमींना रुग्णवाहिका चालक आशुतोष शेलार यांनी उपचारार्थ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले.तर कजगाव रोडवरील आकाश मॉल जवळ दुपारी चारच्या सुमारास मोटरसायकलींच्या धडकेत

सुफियान शेख सिकंदर (२५) रा.पारोळा हा जखमी झाला. याला रुग्णवाहिका चालक प्रसाद राजहंस याने कुटीर रुग्णालयात दाखल केले.डॉ. गणेश कोळी,पंकज ब्रदर, परिचारिका दामिनी,मंगला त्रिवेणी,सोनाली गुरव यांनी जखमींवर प्रथमोपचार केला. जखमींपैकी एक धुळे येथे तर काही शहरातील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसात कुठलीही नोंद नव्हती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!