वाडे येथील श्री.नंदराज पाटील साहेबांची मुंबई लोहमार्ग च्या डीवाएसपी पदी पदोन्नती. श्री. नंदराज पाटील साहेबांचे वाडे परीसरातुन होतेय अभिनंदन.

0 301

वाडे येथील श्री.नंदराज पाटील साहेबांची मुंबई लोहमार्ग च्या डीवाएसपी पदी पदोन्नती. श्री. नंदराज पाटील साहेबांचे वाडे परीसरातुन होतेय अभिनंदन. 

भडगाव प्रतिनिधी:-

तालुक्यातील वाडे येथील भुमिपुञ व सध्या मुंबई येथील क्राईम बॅंचला कार्यरत असलेले कर्तव्यनिष्ठ वरीष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय श्री. नंदराज दिनकरराव पाटील साहेबांची नुकतीच मुंबई लोहमार्गसाठी शासनाने सेवा जेष्ठतेनुसार त्यांची डीवाएसपी पदावर पदोन्नतीने नियुक्ती केलेली आहे. त्यांनी आपल्या पदाचा चार्ज स्विकारलेला आहे. त्यांनी धुळयासह

इतर जिल्हयात नोकरी करुन आपल्या कार्य, कर्तुत्वाची छाप पाडुन यश मिळविलेले आहे. त्यांनी पोलीस निरीक्षक पदि ११ वर्ष नोकरी केली आहे. सुरुवातीला त्यांनी मुंबई खार पोलीस स्टेशनला नोकरी केली आहे. त्यानंतर धुळे, शिरपुर, नंदुरबार, तळोदा, नाशिक ग्रामिण यासह विविध क्षेञात एकुण २९ वर्ष सेवा प्रामाणिकपणे बजावलेली आहे. मागील महिन्यात त्यांची खार पोलीस स्टेशन वरुन मुंबई क्राईम बॅंचला वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदि पदोन्नतीने नियुक्ती झाली होती. ते वाडे येथील माजी सरपंच व नेताजी सुभाष ग्राम वाचनालयाचे चेअरमन दिनकरराव पतींगराव पाटील यांचे ते सुपुञ आहेत. या नियुक्तीबद्धल श्री. नंदराज पाटील यांचे वाडे गावातील ग्रामपंचायत, श्री. हनुमान विविध कार्यकारी सोसायटी, नेताजी सुभाष ग्राम वाचनालय, यशवंत दुध उत्पादक सोसायटी, तांदुळवाडी कजगाव फृटसेल, शितल मजुर सोसायटी यासह सर्व संस्था, नागरीकातुन अभिनंदन होत आहे. तसेच पञकार अशोक बापु परदेशी व मिञ परीवार, माजी उपसरपंच सौ. ऊषाबाई अशोक परदेशी व मिञ परीवारामार्फतही आदरणीय श्री. नंदराज पाटील यांचे मनापासुन अभिनंदन केले जात आहे. श्री. नंदराज पाटील सुसयंमी व मितभाषी असे स्वभावाचे नेतृत्व आहे. शेती मातीत राञंदिवस कष्ट करुन मेहनतीने त्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन सुरुवातीला यश संपादन केलेले आहे. त्यांच्या मेहनतीला हे यशाचे फळ आलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!