ग्रामसभेत शिवीगाळ ; दोन जणांविरुद्ध गुन्हा.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – तालुक्यातील शेळावे खुर्द येथे घरकुल संदर्भात असलेल्या ग्रामसभेत घरकुल बाबत विचारणा करणाऱ्या महिलेला सरपंच पती व एकाने जातिवाचक शिवीगाळ करत ग्रामसभेतून हाकलून दिल्या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेळावे खुर्द येथे रविवारी (ता.३) सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान ग्रामपंचायत कार्यालयाचा आवारात घरकुल संदर्भात ग्रामसभा आयोजीत केली होती.ग्रामसभेत पमाबाई उर्फ आशाबाई एकनाथ भिल ह्या महिलेने घरकुल मंजूर झाले नाही यासंदर्भात विचारणा केली असता सरपंच पती अमोल राजेंद्र पाटील,आसिफ आयुब खाटीक दोन्ही रा. शेळाचे खुर्द यांना या गोष्टीचा राग आल्याने त्यांनी मज्जाव केला तसेच जातिवाचक शिवीगाळ करून हात धरून ग्रामसभेतून हाकलून दिले.याप्रकरणी पमाबाई भिल यांनी पारोळा पोलीस ठाण्यात आज फिर्याद दिली,त्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.