आज देशभरात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा होत आहे
पाचोरा प्रतिनिधी :-
भावंडांच्या प्रेमाचा व आपुलकीचा प्रतीक असलेला रक्षाबंधन सण आज संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होत आहे. बहिणी आपल्या भावांच्या हातावर राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्याची, आनंदाची आणि सुखसमृद्धीची मनापासून प्रार्थना करत आहेत. भावंडेदेखील बहिणींच्या रक्षणाची शपथ घेत त्यांना भेटवस्तू देत आहेत.
पाचोरा शहरात तसेच परिसरात ठिकठिकाणी सणाचा रंगतदार माहोल दिसत असून बाजारपेठा राख्या, मिठाई आणि भेटवस्तूंनी गजबजल्या आहेत. चौक-चौकात आणि गल्लीबोळांत सणाची आनंदी वातावरणाची झलक स्पष्टपणे जाणवत आहे.