सावखेडा येथे माजी सैनिकांचा आदर्श – स्वखर्चातून उभी केली स्मशानभूमी.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
सावखेडा (ता. पाचोरा) येथील माजी सैनिक राजेश धना सोनवणे यांनी गावातील नागरिकांसाठी प्रेरणादायी कार्य करत स्वखर्चातून दहा लाख रुपये खर्च करून सुसज्ज स्मशानभूमी उभी केली आहे.
गावकऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीनंतरही स्मशानभूमीची सोय होत नव्हती. ही गरज ओळखून भारतीय सैन्यात सेवा बजावून गावात परतलेल्या सोनवणे यांनी स्वतःची बचत वापरून बांधकामास सुरुवात केली. यामध्ये प्रवेशद्वार, बैठकीची सोय, पाणीटाकी, वृक्षारोपण यांचा समावेश आहे. काही दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे.
गावकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत, “माजी सैनिकांनी केलेले हे समाजसेवेचे कार्य गावासाठी प्रेरणादायी आहे” असे मत व्यक्त केले.
उद्घाटन ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.
राजेश सोनवणे म्हणाले, “देशसेवेप्रमाणेच समाजसेवाही माझं कर्तव्य आहे. गावाच्या गरजा पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे.”