पारोळ्यात संत नरहरी महाराज जयंती साजरी.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – येथील सुवर्णकार समाजाचे आराध्य दैवत श्री संत नरहरी महाराज यांची जयंती अहिर सुवर्णकार मंगल कार्यालयात साजरी करण्यात आली.श्री संत नरहरी महाराज यांचा प्रतिमेचे पूजन,आरती समाज अध्यक्ष छोटू जडे,योगेश रणधीर, रविंद्र सोनार,दिलीप शिरूडकर,राजेंद्र टोळकर
वासुदेव सोनार,माजी नगरसेवक नितीन सोनार,श्याम बागुल,दिलीप सोनार, रविंद्र सोनार,सतीश बागुल,अरुण सोनार,बापू सोनार यांसह उपस्थित समाज बांधव यांनी केली. यावेळी समाज हितासाठी वेगवेगळ्या विषयावर विचारविनिमय चर्चा होऊन समाजउपयोगी विविध उपक्रम हाती घेण्यात येतील असे मत मांडण्यात आले.