लम्पी मुक्त तालुक्यासाठी उपाययोजना करा – डॉ.उल्हास देवरे

(पारोळा येथे पशुवैद्यकीय अधिकारी,डॉक्टरांची आढावा बैठक)

0 29

लम्पी मुक्त तालुक्यासाठी उपाययोजना करा – डॉ.उल्हास देवरे

(पारोळा येथे पशुवैद्यकीय अधिकारी,डॉक्टरांची आढावा बैठक)

पारोळा प्रतिनिधी :-

तालुक्यात गुरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव आहे,या प्रादुर्भावातून तालुका दीर्घकाळासाठी लवकरात लवकर कसा मुक्त होईल यासाठी हव्या त्या उपाययोजना करून तालुका लम्पी मुक्त करा अशा सूचना तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांनी आयोजीत पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या आढावा बैठकीत केल्या.

गुरांवर येणाऱ्या लम्पी या चर्मरोगाबाबत तालुकास्तरिय समितीची आढावा बैठक तहसीलदार डाॅ.उल्हास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली पारोळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात घेण्यात आली. यावेळी पशुधन विस्तार अधिकारी डॉ.भाग्यश्री केंद्रे, पशुधन विकास अधिकारी डॉ.करिष्मा तडवी,गट विकास अधिकारी संजय मोरे यांचेसह पशुधन पर्यवेक्षक डॉ. शांताराम पाटील,दत्तात्रय जाधव,सुवर्णा धुळे,चेतन पाटील,प्रविण इनकर, तेजपाल मोरे,सिद्धिविनायक बोरे व तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार डाॅ.उल्हास देवरे यांनी गाव निहाय आढावा,मार्गदर्शन बैठका घेऊन बाधित केसेसबाबत नियमीत

पाठपुरावा,लसीकरण,गोठा फवारणी आदींबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात.लम्पी चर्मरोगाबाबत तालुक्यातील सद्यस्थिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, लसीकरण,बाधित गुरांचे विलगीकरण,उपचार तसेच स्वच्छ गोठा याबाबत ग्रामपंचायत तसेच नगरपालिका क्षेत्रात करावयाची फवारणी,मोकाट गुरांबाबत करावयाची कार्यवाही,मृत जनावरांची योग्य विल्हेवाट,१० किमी परिसरातील गुरांचे खरेदी- विक्री बाजार बंद,वाहतूक बंद याबाबत ही सूचना त्यांनी यावेळी केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!