जवखेडे सिममध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड – १५ जुगारी ताब्यात.!!!
कासोदा प्रतिनिधी :-
एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जवखेडे सिम गावात गलापूर रस्त्यालगत काटेरी झुडुपांच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत १५ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले.
ही कारवाई दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.२५ वाजता करण्यात आली. कासोदा पोस्टचे सपोनि निलेश राजपूत यांना दुपारी २ वाजता गोपनीय माहिती मिळाली होती की काही संशयित व्यक्ती झुडुपांमध्ये पत्त्यांचा जुगार खेळत आहेत. त्यांनी तत्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले.
धाड टाकण्यात आले असता १५ जुगारी पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले. पंचासमक्ष खात्री केल्यानंतर सर्वांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे:
1. वीरभान श्रावण भिल
2. सोनू डाकू भिल
3. राहुल संतोष सोनवणे
4. संतोष माधव सोनवणे
5. प्रवीण वसंत सोनवणे
6. सुनील दगा ठाकरे
7. मांगीलाल भाईदास चव्हाण
8. रतन धाकू भिल
9. अशोक गोविंदा पाटील
10. सचिन बापू पवार
11. कांतीलाल महादू सोनवणे
12. उत्तम बालाआप्पा झेंडे
13. समाधान बापू पाटील
14. संभाजी महारू पाटील
15. सुनील सिताराम वाघ
सर्व आरोपी हे रा. जवखेडे सिम, ता. एरंडोल येथील रहिवासी आहेत.
त्यांच्या अंगझडतीमध्ये ६,३९० रुपये रोख, तसेच अंदाजे १.१५ लाख रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. एकूण ₹१,२१,३९० चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी पो.कॉ. दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (पवार), उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर कारवाई सपोनी निलेश राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पोहेकॉ. नंदलाल परदेशी, पो.ना. प्रदीप पाटील, पोकॉ. समाधान तोंडे, निलेश गायकवाड, कुणाल देवरे, योगेश पाटील, प्रदीप देसले, लहू हटकर यांच्या पथकाने केली.