पारोळा येथे शेतकऱ्याची गळफास.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – येथील एका ४२ वर्षीय शेतकऱ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
पारोळा शहरातील देवी पद्मावती नगर येथील रहिवासी दशरथ हिलाल महाडिक हे गवंडीकाम सह दुसऱ्याची शेती जुप ने करून आपला परिवाराचा उदरनिर्वाह भागवत होते. सततची नापिकी व दुष्काळग्रस्त स्थितीमुळे ते नैराश्यात होते.त्यांच्यावर फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याने ते कर्ज कसे फिटेल या चिंतेत नेहमी असायचे. दिनांक पाच रोजी सायंकाळी सहा वाजता शेतातून घरी आल्यानंतर त्यांनी कोणालाही काही न सांगता घराच्या मधला दरवाजा बंद करत पंख्याला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबत बालू भिला भोसले यांच्या खबरीवरून आज पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.