पारोळा तालुक्यात पीएम किसान चे साडेबत्तीस कोटी शेतकऱ्यांचा खात्यात.!!!

0 23

पारोळा तालुक्यात पीएम किसान चे साडेबत्तीस कोटी शेतकऱ्यांचा खात्यात.!!!

पारोळा प्रतिनिधी :-

पारोळा – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाखो लाभार्थी शेतकऱ्यांचा बँक खात्यात शनिवारी दीर्घ प्रतीक्षेनंतर केंद्र सरकारकडून २० वा हप्ता जमा करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसी येथून देशभरातील शेतकऱ्यांना ही रक्कम जारी केली.या पार्श्वभूमीवर पारोळा येथे तहसिल कार्यालयात आमदार अमोल पाटील यांचा प्रमुख उपस्थितीत योजने अंतर्गत पारोळा तालुक्यातील २७ हजार लाभार्थी शेतकऱ्यांचा बँक खात्यात ३२ कोटी ५० लक्ष रूपयांचा निधी हा वर्ग करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजना भित्ती पत्रकाचे विमोचन,स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांचा वारसांना प्रत्येकी २ लक्ष प्रमाणे १२ वारसांना २४ लक्ष रूपये अनुदान, प्रमाणपत्राचे वितरण,कृषि विभागाचा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत ५९ फळबाग केलेल्या शेतकरी लाभार्थ्यांना ११ लक्ष ३६ हजार रूपये अनुदान वितरण आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसिलदार डॉ. उल्हास देवरे,तालुका कृषि अधिकारी दिपक आहेर, तालुकाप्रमुख मधुकर पाटील, बाजार समिती मा. उपसभापती दगडु पाटील, शेतकी संघाचे संचालक भैय्यासाहेब पाटील यांचेसह महसुल,कृषि विभागाचे अधिकारी,कर्मचारी,शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान पीएम किसान योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी केंद्र शासन ६ हजार व राज्य शासन ६ हजार असे एकुण १२ हजार रुपयांची आर्थिक मदत सुनिश्चित करते.

अद्याप अनेक लाभार्थ्यांना केवायसी,बँक खाते,मोबाईल नंबर लिंक आदी उद्भवणाऱ्या समस्यांमुळे या योजनेचा लाभ मिळत नसून ते वंचित आहेत.अशा पात्र लाभार्थीचा तक्रारी आहेत परंतु त्यांचा समस्येचे निराकरण होत नाही,यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आपल्या स्तरावरून सुरू करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना आ. अमोल पाटील यांनी सुचित केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!