महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांचा सत्कार
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव येथे नुकताच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक श्री. महेश शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. पुष्पगुच्छ, देऊन त्यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला.
या प्रसंगी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा, खान्देश विभागीय अध्यक्ष गणेश रावळ, तालुकाध्यक्ष भास्कर पाटील, सचिव मनीष सोनवणे, तालुका उपाध्यक्ष अलीम शाह, देवा महाजन, गोपाल भोई, सलाउद्दीन शेख, मुजम्मील शेख अन्वर शेख, जावेद शेख,आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्री. शर्मा यांचे अभिनंदन करताना त्यांच्या पारदर्शक, कर्तव्यनिष्ठ आणि जनतेशी सुसंवाद साधणाऱ्या कार्यशैलीचे विशेष कौतुक केले.
आपल्या उत्तरपर भाषणात पोलिस निरीक्षक महेश शर्मा म्हणाले, “भडगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभाग सदैव तत्पर राहील. पोलीस आणि पत्रकार यांच्यात समन्वय राहिला, तर समाजात सकारात्मक बदल घडवणे शक्य होते.”