आमडदे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.!!!

0 81

आमडदे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

सालाबादप्रमाणे आमडदे (ता. भडगाव) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामस्थ आणि समाजबांधव यांच्या उपस्थितीत आनंदी वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात भडगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी भोसले यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजा व नारळ वाढवून करण्यात आली.

या प्रसंगी बोलताना संभाजी भोसले म्हणाले, “स्वातंत्र्यानंतर देशातील गोरगरीब जनतेचा विचार न करता योजना राबवण्यात आल्या. त्या काळात दिड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी आपली शाहिरी, कथा, कादंबऱ्या, लोकगीते व पोवाड्यांमधून समाजजागृतीचे कार्य केले. ‘ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है’ या त्यांच्याच ओळी आजही वास्तव दर्शवतात.”

त्यांनी ‘फकिरा’, ‘वैजंता’ यांसारख्या प्रभावी कादंबऱ्यांतून समाजातील विषमता आणि अन्याय यावर प्रकाश टाकला. दलित आणि वंचितांच्या न्यायहक्कासाठी लढणारे अण्णाभाऊ हे आझाद मैदानावर भव्य मोर्चा नेणारे दमदार व्यक्तिमत्त्व होते, असेही भोसले म्हणाले.

“आमडदे गावात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासाठी आपण लवकरच प्रयत्न करू,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमास शालीक बोरसे, धनराज बोरसे सर, मनोज बोरसे, शेखर बोरसे (एअर इंडिया, मुंबई), भैय्या बिगारी, राहुल बोरसे (मुंबई होमगार्ड), सुनील भोसले, मुन्ना शेख, सुनील टेलर, विनोद पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!