माजी आमदारांच्या घरी धाडसी चोरी ; ३४ लाखाचा मुद्देमाल लंपास.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांच्या पारोळा तालुक्यातील राजवड येथील घरी अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली.त्यात सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असे एकूण ३४ लाखाचा ऐवज हा चोरट्यांनी चोरून नेला.ही घटना शुक्रवारी (ता.१) मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
राजवड येथील रहिवासी व अमळनेर विधानसभेचे माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील हे कामानिमित्त आपल्या मुलाकडे नाशिक येथे गेले असता,शुक्रवारी रात्री दोन ते चार च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचा बंद घराचा फायदा घेत घराच्या वॉल कंपाऊंड मधून प्रवेश करत घराचा मुख्य दरवाजाच्या कडी कोंडा तोडून वरच्या मजल्याचा दोन्ही बेडरूम चा लोखंडी कपाटातील मंगलपोत,
हार बांगड्या असे २४ लाखाचे दागदागिने व १० लाख रुपये रोख आणि आठ हजाराचा डीवीआर असा एकुण ३४ लाख आठ हजाराचा मुद्देमाल हा चोरट्यांनी चोरून नेला.ही घटना दोन रोजी उघडकीस येत घरा शेजारील व त्यांचे नातू निलेश अशोक पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ याबाबत साहेबराव पाटलांना माहिती दिल्याने ते नाशिकहून दुपारी दोन वाजेच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले तेथे डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक सचिन सानप,पोलीस उपनिरीक्षक योगेश महाजन,कॉ.महेश पाटील,योगेश शिंदे,आशिष गायकवाड,अभिजीत पाटील, सुनिल हटकर,स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पथकासह फॉरेन्सिक टीम, श्वान पथक,फिंगर प्रिंट तज्ञ हे ही दाखल झाले.घटनेची कसून चौकशी सुरू असुन चोरांच्या शोधार्थ पथक नेमण्यात आले आहे.
दरम्यान चोरट्यांनी चोरी केल्यानंतर माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या घराच्या परिसरात बसवलेल्या कॅमेराचा डीव्हीआर ही लंपास केला परंतु ग्रामपंचायतीचे असलेल्या कॅमेरामध्ये चोरटे काही प्रमाणात दिसत असल्याचे समजले.याबाबत निलेश पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.