जळगावमहाराष्ट्रराजकीय

शेतकरी व कार्यकर्त्यांशी अपमानास्पद वर्तनप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली करण्याची मागणी.!!!

शेतकरी व कार्यकर्त्यांशी अपमानास्पद वर्तनप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली करण्याची मागणी.!!!

एरंडोल प्रतिनिधी :-

शेतकरी कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी २४ जुलै रोजी कासोदा (ता. एरंडोल) येथे पारोळा टी-पॉईंटवर प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत यांनी शेतकरी व कार्यकर्त्यांशी अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप करत, त्यांच्या बदलीची मागणी करत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी “तुमचं फोटोशेशन झालं असेल तर ही नौटंकी बंद करा” असे उद्दाम व अपमानास्पद शब्द वापरत आंदोलनकर्त्यांचा अपमान केला. या घटनेचा निषेध करत पक्षाच्या वतीने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना व्हिडिओ पुरावा मेलद्वारे पाठवण्यात आला होता. मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे.

जर तात्काळ बदली अथवा निलंबनाचे आदेश न काढले गेले, तर १५ ऑगस्ट रोजी प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी कार्यकर्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

या निवेदनावर तालुका अध्यक्ष सुनिल पाटील उमरेकर, तालुका सरचिटणीस अनिल पाटील, माजी सरपंच सुनिल दयाराम पाटील, मनोहर मगर, विजय महाजन, सुनिल हरगुडे, राजेंद्र फणसे, सचिन पाटील आणि अभिनव पाटील यांच्या सह्या आहेत.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!