आपला जिल्हाआरोग्यमहाराष्ट्र

जागतिक कावीळ दिन जनजागृती रॅली संपन्न.!!!

जागतिक कावीळ दिन जनजागृती रॅली संपन्न

कावीळ संसर्ग कमी करण्यासाठी समाजाचा सहभाग महत्वाचा

– जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे

 

महाराष्ट्र डायरी न्युज करिता सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री.राहुल गावडे पाटील

सातारा : भारतात दरवर्षीत अडीच लाख मृत्यु कावीळीमुळे होतात म्हणजे तिस सेकंदात एक मृत्यु होत आहे. कावीळ हा गंभीर आजार असून प्रत्येक व्यक्तीने कावीळीची तपासणी करून घेणे व लसीकरण करुन घेणे गरजेचे असून कावीळीचा संसर्ग रोखण्याकरीता समाजाचा सहभागही महत्वाचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी केले.

जागतिक कावीळ दिन २८ जुलै रोजी पाळला जातो या निमित्ताने स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम व रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. करपे बोलत होते. कार्यक्रमास छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठता डॉ. भारती दासवाणी, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राहुलदेव खाडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष कदम, डॉ सुनिल चव्हाण, डॉ. निलेश कुचेकर, हेमंत भोसले यांच्यासह छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते

कावीळ नियंत्रण सप्ताहानिमित्त आरोग्य कर्मचा-यांचे कावीळ लसीकरण, जिल्हा कारागृह बंदयांची तपासणी, गरोदर मातांची तपासणी तसेच विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!