क्राईमजळगाव

पळासखेडे बियर शॉपीवर भडगाव पोलिसांची धाड, २८ हजारांची अनधिकृत दारू जप्त.!!!

पळासखेडे बियर शॉपीवर भडगाव पोलिसांची धाड, २८ हजारांची अनधिकृत दारू जप्त.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथील महिंदळे रस्त्यावर असलेल्या सूर्यमित्रा बियर शॉपी मध्ये अनधिकृतपणे देशी व विदेशी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना मिळाली. या माहितीनंतर २९ जुलै रोजी पोलिसांनी या बियर शॉपीवर धाड टाकून मोठी कारवाई केली.

या कारवाईत २८ हजार रुपये किमतीची अनधिकृत देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. संदीप जगदीश पवार (वय २२, रा. रुपनगर, पो. पळासखेडा, ता. भडगाव) हा व्यक्ती विनापरवाना दारू विक्रीसाठी बाळगत असल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण कडू परदेशी यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक २७८/२०२५ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत ही नोंद झाली आहे.

ही कारवाई जळगांव पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (चाळीसगाव परिमंडळ) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते (अमळनेर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली पो.हे.कॉ. निलेश ब्राम्हणकर, पो.ना. मनोज माळी, पो.कॉ. प्रवीण परदेशी, पो.कॉ. सुनील राजपूत, पो.कॉ. संदीप सोनवणे, ललित पाटील यांनी सहभाग घेतला.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक मनोज माळी करत आहेत.

 

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!