गोंडगाव विदयालयात सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील गोंडगाव माध्यमिक विदयालयातील चिञकला शिक्षक पी. व्हि. जाधव हे आपल्या ३२ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतुन नुकतेच सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभाचे आयोजन विदयालयामार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे मुख्याध्यापक बी. जी. नन्नावरे हे होते. यावेळी व्यासपिठावर वाडे विदयालयाचे मुख्याध्यापक एन. एस. बोरसे, गोंडगाव विकासोचे माजी चेअरमन प्रमोद मोराणकर , वाडे माजी सरपंच आधार माळी, बहाळ विदयालयाचे उपशिक्षक बोधीराज वाडेकर, माजी उपशिक्षक पी. व्हि. चव्हाण,
अमृत सखाराम महाजन. माजी मुख्याध्यापक एन. के. सांगळे , कोळगावचे माजी सरपंच बापु रूपचंद पाटील, भडगाव पंचायत समितीच्या माजी सभापती लक्ष्मीबाई पाटील, संजय एकनाथ महाजन, प्रकाश एकनाथ महाजन, माजी मुख्याध्यापक एस. आर. माळी, दिनकर महाराज, एस. वाय. पाटील , वाघळी विदयालयाचे शिक्षक अनिल साळुंखे, क्रिडाशिक्षक ज्ञानेश्वर महाजन , माजी मुख्याध्यापक ओ. पी. जाधव, विजय देशमुख , अरुण अहिरे, रामचंद्र बागुल आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक एस. आर. महाजन यांनी केले. सुञसंचलन व्हि. ए. पाटील, पी. व्हि. सोळंके, दहावीच्या विदयार्थीनी नेहा पाटील, स्वाती पाटील आदिंनी केले.
सेवानिवृत्ती निमित्त कलाशिक्षक पी. व्हि. जाधव यांचेसह विदयालयामार्फत सपत्नीक सत्कार करण्यात आला. श्री. शिवाजी महाराज यांची राज्यभिषेक प्रतिमा व ड्रेस, साडी देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित नातेवाईक,
मिञपरीवार आदिंनीही सत्कार केला. पी. व्हि. जाधव यांनी विदयालयाला साऊंडस्टीम भेट दिली.
तसेच या कार्यक्रमात बी. डी. बोरसे, ए. एम. परदेशी, वाघळी विदयालयाचे क्रिडाशिक्षक ज्ञानेश्वर महाजन, गणेशपुर विदयालयाचे कलाशिक्षक अरुण अहिरे यांचेसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करुन सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच कलाशिक्षक पी. व्हि. जाधव यांनी माझी ३२ वर्षे सेवा चांगली पार पडली सर्व स्टाॅफचे वेळोवेळी सहकार्य लाभले असे सांगीतले. आभार एस. डी. चौधरी यांनी मानले.
याप्रसंगी विदयालयाचे मुख्याध्यापक बी. जी. नन्नवरे, सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, आर. एस. देवकर, व्हि. ए. पाटील, एस. आर.पाटील, एस. वाय. पाटील, पी. व्हि. सोळंके, बी. डी. बोरसे, एस. एस. आम्ले, एस. आर. महाजन, एन. ए. मोरे, पी. जे. देशमुख, एस. जी. भोपे, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे, व्हि. एम. जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी उपस्थित होते.