रोकड चोरून पसार झालेला चोरटा जेरबंद.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – चहाच्या दुकानातून दहा हजार रुपयांची रोकड चोरून पसार झालेल्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखा व पारोळा पोलिसांनी २४ तासात अटक केली आहे.
भूषण कैलास चंदनशिव वय २७,रा अमळनेर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
तालुक्यातील जोगलखेडे येथे विनोद भालेराव पाटील यांचे चाळीसगाव रोडावर चहाचे दुकान आहे.ते २३ च्या पहाटे पाच वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा त्यांना दुकानाचे शटर अर्धवट उघड्या परिस्थितीत दिसुन, दुकानातील दहा हजार दोनशे रुपये चोरी झाल्याचे समजले. सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता यावेळी भूषण चंदनशिव हा चोरी करताना दिसून आला.याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पारोळा पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी तपासचक्र फिरवीत,स्थानिक गुन्हे शाखेचे विनोद झाल्टे, हिरालाल पाटील,प्रवीण मांडोळे,राहुल कोळी,पारोळा पोलीस स्टेशनचे हितेश चिंचोरे,प्रकाश गवळी,
चंद्रशेखर सोनवणे,योगेश शिंदे,जयवंत सपकाळे या पथकाने आरोपीला २४ तासात जेरबंद केले.तसेच गुन्ह्यातील मोटरसायकल ही जप्त केली आहे.आरोपीला आज न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.