माऊली फाऊंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड संगोपन संकल्प.!!!

0 240

माऊली फाऊंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड संगोपन संकल्प.!!!

भडगांव प्रतिनिधी :-

माऊली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून २०२५ या वर्षी ५०१ वृक्ष लागवड संगोपन अभियानाचा प्रारंभ उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, संचालिका संगिता जाधव, जनमंच संस्थाध्यक्ष शिवराम पाटील, शेतकरी संघ संचालिका नगरसेविका योजना पाटील,

मोरसिंग राठोड, निलेश मालपुरे, शांताराम पाटील, गुलाबसिंग पाटील, राजेश वाघ, साई समर्थ मतीमंद शाळा अधीक्षकांसह सहकारी वृंद यांचे प्रमुख उपस्थितीत साई समर्थ मतीमंद शाळा नाचणखेडा रोड येथून करण्यात आला. सजीव सृष्टी वाचवायची असेल तर निसर्ग पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड व त्यांचे संगोपन करणे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. मान्यवरांनी फाउंडेशनच्या वतीने रक्तदान व मोफत रोगनिदान शिबिरांसह प्रबोधनात्मक उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मनोगतातून व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!