शेत रस्त्यांच्या समस्यांवर दिलासा–आमदार किशोर आप्पा पाटील यांची पत्रकार परिषद.!!!

0 27

शेत रस्त्यांच्या समस्यांवर दिलासा–आमदार किशोर आप्पा पाटील यांची पत्रकार परिषद.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अलीकडेच एक पत्रकार परिषद घेऊन आपले कार्यकाळातील अनुभव आणि भविष्यातील विकास योजना यांची माहिती दिली.

“गेल्या अकरा वर्षांपासून मी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, जनतेच्या समस्या सातत्याने विधानसभेत मांडल्या आहेत,” असे आमदार पाटील यांनी सांगितले.

आपल्या वक्तव्यात त्यांनी तालिका अध्यक्षपदाच्या जबाबदारीबाबत गौरवाने उल्लेख केला. “288 आमदारांसाठी नव्हे, तर 14 कोटी महाराष्ट्रवासीयांसाठी मी काम करतोय,” असे ते म्हणाले.

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरलेल्या शेत रस्त्यांबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. “दररोज 200-300 फोन येतात, त्यातील निम्मे शेत रस्त्यांच्या तक्रारींबाबत असतात,” असे ते म्हणाले. त्यांनी यासाठी भरत शेठ गोगावले यांच्याकडे लक्ष वेधल्याचेही सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन देऊन, येत्या पाच वर्षांत 100% शेत रस्त्यांचे मजबुतीकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, एका महिन्यात अहवाल अपेक्षित आहे.

“या निर्णयामुळे शेतकरी बंधूंच्या समस्या कायमस्वरूपी सुटतील,”असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!