श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह संपन्न.!!!
भडगाव ता प्रतिनिधी आमीन पिंजारी
कजगाव तालुका भडगाव येथे श्री संत सावता महाराज मंदिर जीन एरिया येथे श्री संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मोठ्या भक्ती भावाने करण्यात आले होते, सप्ताहाभर हरिनाम कीर्तन सोहळ्याला शहर व परिसरातील भाविक भक्तांचा उत्सव पूर्व प्रतिसाद लाभला, श्री संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाला दिनांक 17/7/2025 गुरुवारपासून सुरुवात करण्यात आली होती, गेल्या सात दिवसापासून सायंकाळी 6 ते 7 हरिपाठा चे आयोजन रात्री 9 ते 11 हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते, परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी किर्तन सप्ताह चा लाभ घेतला, अनेक मंडळांनी उत्साह मध्ये सहभाग नोंदवत श्रद्धेने सेवा बजावली , संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता, दिनांक 14 /7/ 2025 रोजी अकरा वाजता सप्ताहाची सांगता करण्यात आली, यावेळी पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली सप्ताह सोहळा प्रसंगी महाप्रसाद दातृत्व श्री विजय कौतिक महाजन यांनी केले, सप्ताहाच्या समोरोपाला भव्य पालखी सोहळा काढण्यात आला ज्यामध्ये वारकऱ्यांनी अभंग गात पारंपारिक वेशभूषेत सहभागी होते संपूर्ण परिसर भक्तीमय केला, श्री संत सावता महाराज यांच्या जीवन कार्याचे स्मरण करत त्यांच्या भक्ती पंथातील योगदानाची आठवण करून देणारा हा सत्ता भाविक भक्तांसाठी एक अध्यात्मिक ऊर्जा देणारा ठरला, कार्यक्रमाचे आयोजन श्री संत सावता महाराज माळी मंडळ व समाज बांधव स्थानिक भक्त मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने अत्यंत यशस्वीरित्या पार पडले.