कार ची बैलगाडी ला धडक.कोठलीच्या बैलगाडी मालकासह बैलही जखमी.!!!

0 31

कार ची बैलगाडी ला धडक.कोठलीच्या बैलगाडी मालकासह बैलही जखमी.!!!

भडगाव प्रतिनिधी

भडगाव चाळीसगाव रोडवर कोठली फाटा हॉटेल वैभव जवळरोड वर मारुती कार क्र. एम एच ०२ बी आर १६०१ ही कार भरधाव वेगाने बेदरकारपणे हयगयीने चालवून त्याचे पुढे बैलगाडा घेऊन जाणार्या बैलगाडीस ठोस मारली. या अपघातात बैलगाडी चालक विजय धनराज पाटील वय ४५ वर्ष रा कोठली. ता. भडगाव हे गंभीर जखमी झाले आहेत. व बैलगाडीचे नुकसान करून बैलगाडीला जुंपलेले बैलांना दुखापत कारणीभूत झाला. ही घटना दि. १८ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. जखमीचे काका रवींद्र दौलत पाटील वय ४९ धंदा शेती रा कोठली. ता. भडगाव जि. जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादि वरून कार चालक सुधीर कुमार नारायण पाटील रा. निगडी. पुणे यांच्या विरोधात भडगाव पोलीस स्टेशनला गु र नं २६६/२०२५ भा. न्या. संहिता २०२३ कलम २८१, १२५, (अ), १२५(ब), ३२४(४),३२५ प्रमाणे

दि. २१ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार संजय पाटील हे करीत आहेत. घटनेतील जखमी विजय पाटील हे गंभीर जखमी असून त्यांना सुरुवातीस भडगाव ग्रामिण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जखमी विजय पाटील यांना पुढील उपचारासाठी चाळीसगावहुन धुळे व नंतर नासिक येथे औषधोपचारासाठी हलविण्यात आले आहे. तेथे त्यांचेवर औषधोपचार सुरु आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!