गुणगौरव समारंभामुळे गुणवंत विद्यार्थी,पालक व शिक्षकांना प्रोत्साहन – आ.अमोल पाटील

0 27

गुणगौरव समारंभामुळे गुणवंत विद्यार्थी,पालक व शिक्षकांना प्रोत्साहन – आ.अमोल पाटील

पारोळा प्रतिनिधी :-

 

पारोळा – पारोळा तालुका शैक्षणिक गुणवत्तेत अग्रभागी आहे.यासाठी शिक्षकांचे ही प्रयत्न महत्वपूर्ण आहेत. विद्यार्थ्यांचा यशस्वीतेस पालक,समाजाचा ही विशेष पाठींबा आहे.विद्यार्थी गुणगौरव समारंभामुळे गुणवंत विद्यार्थी,पालक व शिक्षकांनाही प्रोत्साहन मिळते असे प्रतिपादन आमदार अमोल पाटील यांनी केले.

येथील सूर्यवंशी बारी समाजातर्फे आयोजीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभात ते बोलत होते.

यावेळी जळगांव नागवेल प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रा.नितीन उत्तमराव बारी,सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई बारी, मा.नगरसेवक सुरेश बारी, शिवसेना शहरप्रमुख अमृत चौधरी,अमोल चौधरी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रारंभी देवी सरस्वती व बारी समाजाचे आराध्य दैवत श्री संत रूपलाल महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण, पुजन व वंदन करून कार्यक्रमाला सुरूवात झाली. यावेळी इयत्ता १० वी,१२ वी सह अन्य परीक्षेंत यशस्वी गुणवंत विद्यार्थांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांचा हस्ते गौरवण्यात आले.तसेच त्यांना शालेय बॅग,थर्मास पाणी बॉटल, शालेय पॅड,वह्या आदी शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले.

यावेळी नागवेल प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा.नितीन बारी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकायचे असेल नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे अभ्यासाची कास धरावी,उत्तुंग भरारी घेऊन समाजाचे नावलौकिक करावे व ऋण फेडावे असे मनोगतात व्यक्त केले. सूत्रसंचालन परेश सौपुरे यांनी केले.आभार गणेश बारी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी समाज अध्यक्ष मोतीलाल बारी,उपाध्यक्ष गणेश बारी,सल्लागार राजु बारी,महेंद्र बारी,दत्तात्रय बारी, सुनिल बारी,ज्ञानेश्वर दगडू बारी,ज्ञानेश्वर त्रंबक बारी, शरद बारी,ईश्वर बारी,अनिल बारी,जितेंद्र बारी,जितेंद्र दिनकर बारी आदींनी परिश्रम घेतले.

सूर्यवंशी बारी समाजातर्फे आमदारांचा सत्कार,आभार

मा.आमदार चिमणराव पाटील यांच्या कार्यकाळात सूर्यवंशी बारी समाजासाठी २० लक्ष निधीतून सभागृह मंजूर करण्यात आले आणि त्याचे काम पूर्णत्वास ही आले.त्या सभागृहाचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी आमदार पाटील यांच्या हस्ते होत आहे.त्या अनुषंगाने सूर्यवंशी बारी समाजाचा वतीने आमदार अमोल पाटील यांचा सत्कार करून आभार मानण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!