पारोळा शहरात एक लाख ८२ हजाराचा गांजा जप्त.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – शहरातील बहिरम गल्ली येथे आज सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली असता ७१ वर्षीय महिला ही अमली पदार्थ गांजा विक्री करताना तसेच बाळगताना आढळून आली.यावेळी चौकशी केली असता महिलेकडून सुमारे एक लाख ८२ हजाराचा गांजा हा जप्त करण्यात आला.याप्रकरणी मंगलबाई चंद्रकांत सोनार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक सचिन सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर पोउपनि अमोल दुकळे,पोउपनि विजय भोंबे,
पोकॉ अजय बाविस्कर,मिथून पाटील,भुषण पाटील हे पथक बहीरम गल्लीत रवाना झाले.यावेळी मंगलबाई सोनार ह्या ओला व कोरडा गांजा विक्री करताना संशयितरित्या दिसून आल्या तसेच त्यांचा ताब्यातील दोन प्लॉस्टीकचा बॅगेत कोरडा व हिरवा जवळपास तेरा कीलो गांजा आढळल्याने असा एकुण एक लाख ८२ हजाराचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला.याबाबत अभिजीत पाटील यांच्या माहितीवरून पोलिसांत एनडीपीए कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.