अवैध धान्यसाठ्यावर पुरवठा विभागाची धाड,चार लाखाचा मुद्देमाल जप्त.!!!
पारोळा प्रतिनिधी:-
पारोळा – बेकायदेशीर अवैधरीत्या गहू,तांदूळ,ज्वारी माल साठवून ती काळ्या बाजारात विक्रीला जाण्यापूर्वीच पुरवठा विभागाने धाड टाकून सुमारे चार लाखाच्या मुद्देमाल जप्त केला असुन सलग तीन दिवसीय या कारवाईत आज गुन्हा नोंद झाला आहे.
पारोळा शहरातील धरणगाव रस्त्यावर बिजासनी ट्रेनिंग कंपनीत अवैध धान्याच्या साठा असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार डॉ.उल्हास देवरे,पुरवठा निरीक्षक शिवकुमार निरगुळे यांना मिळाल्याने त्यानुसार १७ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांनी गोदामावर धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात धान्याचा साठा हा आढळून आला.त्यात तांदुळ १४७ गोणी ९७.१० क्विंटल, गहू ७९ गोणी ३७.८५ क्विंटल,ज्वारी १५६ गोणी ४६.५ क्विंटल असे एकूण १८१ क्विंटल माल त्याची किंमत सुमारे चार लाख तीन हजार नऊशे असा जप्त करून तो शासकीय गोदामात रवाना करण्यात आला. दरम्यान पोलीस निरीक्षक सचिन सानप व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तात संपूर्ण माल मोजून सील बंद करण्यात आला.याबाबत १९ रोजी चौकशीत बिजासन ट्रेडिंग कंपनीचे कापूस,भुसार माल खरेदी विक्रीचे कासोदा येथील परवाना मिळाला मात्र गोदामातील ह्या धान्य साठा माल खरेदी विक्रीचे कुठलीही कागदपत्रे मिळाली नाही.तीन दिवसांपूर्वी पडलेल्या धाडीनंतर आज २० रोजी पुरवठा निरीक्षक शिवकुमार निरगुळे यांचा फिर्यादीवरून दीपक लोटन चौधरी रा. राजीव गांधी नगर,पारोळा याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.