कन्हेरेत एकाच दिवशी दोन जणांचा मृत्यू,गावात शोककळा
पारोळा प्रतिनिधी:-
पारोळा – एकाचा शॉक लागून तर दुसऱ्याचा झोपेतच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील कन्हेरे येथे घडली.या घटनेमुळे गावात शोककळा पसरून हळहळ व्यक्त होत आहे.
कन्हेरे येथे आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे समाधान प्रल्हाद पाटील (४०) हे आपल्या शेतातील विहिरीच्या मोटरचा पेटी जवळ गेले असता त्यांना अचानक विजेचा जोरदार शॉक लागल्याने त्यांचा जागेवरच पडून मृत्यू झाला. तसेच मध्यरात्रीच्या सुमारास गावातील विठ्ठल विभीषण पाटील (४२) हे रात्री जेवण करून झोपले असता पहाटे घराचा दरवाजा न उघडल्याने तो उघडून पाहिले असता ते मृतावस्थेत आढळून आले. त्यांना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद होऊन पुढील तपास पोलीस हेकॉ डॉ.शरद पाटील करीत आहे.
गावात एकाच दिवशी दोन कर्तबगार इसमांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र शोककळा पसरून हळहळ व्यक्त होत आहे.