क्राईमजळगावमहाराष्ट्र

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; पाचोरात भयानक घटना.!!!

चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून, पाचोरात भयानक घटना.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आज (शनिवार) पहाटे घडली. प्रियंका खुशाल भदाणे (वय २५) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून, आरोपी पती खुशाल भदाणे याने खून केल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत त्याला वाचवून ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, भदाणे दाम्पत्य काही महिन्यांपूर्वीच जारगाव येथे वास्तव्यास आले होते. आज पहाटे दोघांमध्ये चारित्र्यावरून वाद झाला. संतापाच्या भरात खुशाल भदाणे याने घरातील चाकूने पत्नीच्या गळ्यावर व पोटात सपासप वार केले. प्रियंका यांचा जागीच मृत्यू झाला.

खून केल्यानंतर खुशाल याने स्वतः गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु घटनास्थळी वेळेवर दाखल झालेल्या पाचोरा पोलिसांनी त्याला आत्महत्येपासून परावृत्त करून अटक केली.

या प्रकरणी प्रियंका यांच्या मावशीने दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात खुशाल भदाणे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ करत आहेत.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!