स्वर्गीय स्मृतीपित्यर्थ ‘स्वर्गरथ’ लोकार्पण सोहळा संपन्न.!!!
भडगाव ता प्रतिनिधी – अमिन पिंजारी
कजगाव (ता. भडगाव) येथील नंदनवन डेव्हलपर्सचे संचालक नितीन नंदलाल धाडीवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, त्यांच्या वडील स्वर्गीय नंदलाल मोतीलाल धाडीवाल यांच्या स्मृतीपित्यर्थ कजगाव परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी ‘स्वर्गरथ’ सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या ‘स्वर्गरथ’ चे लोकार्पण कजगाव गावाचे सरपंच रघुनाथ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी नितीन धाडीवाल यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य नागरिक, मित्रपरिवार व सामाजिक कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाला भडगाव तालुका संघटक अनिल महाजन, माजी उपसरपंच शफी मणियार, ग्रामपंचायत सदस्य अनिल महाजन, स्वर्णकार समाजाचे अध्यक्ष विजय पोद्दार, पृथ्वीराज पाटील, अनिल पाटील, कैलास महाजन, सामाजिक कार्यकर्ते दिनेश टेलर, एस. बी. पवार सर, दिनेश धाडीवाल, राजेंद्र चव्हाण, पत्रकार अमिन पिंजारी, प्रमोद पवार, नितीन सोनार, नाना पाटील, जाकीर बागवान, आबरार खाटीक, दीपक खैरनार, सुभाष महाजन, प्रकाश पाटील, उद्योजक छोटू जैन, चेतन धाडीवाल, विनय लुंकड, पंकज लुंकड, वर्धमान चोरडिया, धैर्यशील पाटील, रवींद्र पाटील, दशरथ पाटील, योगेश पाटील तसेच परिसरातील असंख्य नागरिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.