पाचोऱ्यात बेकायदेशीर गॅस भरणा धंद्यावर पोलिसांचा छापा.!!!
मशीन व साहित्य जप्त; पोलिसांची तत्काळ कारवाई, स्थानिकांचे स्वागत
पाचोऱ्यात बेकायदेशीर गॅस भरणा धंद्यावर पोलिसांचा छापा.!!!
मशीन व साहित्य जप्त; पोलिसांची तत्काळ कारवाई, स्थानिकांचे स्वागत
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा शहरात बेकायदेशीर गॅस भरण्याच्या व्यवसायावर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी जोरदार कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. दुपारी सुमारे १ वाजता पाचोरा पोलिसांनी अचानक धाड टाकून गॅस भरण्याचे मशीन आणि संबंधित साहित्य जप्त केले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक पाटील, पुरवठा निरीक्षक राहुल पवार, सहाय्यक फौजदार रणजीत पाटील, पोलीस कर्मचारी संदीप राजपूत, संदीप भोई, होमगार्ड कपिल पाटील आणि अन्य पथकाच्या उपस्थितीत करण्यात आली.
या धाडसत्रामुळे शहरात बेकायदेशीर गॅस भरणारे गट हादरले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला असून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या तात्काळ आणि ठोस कारवाईचे स्वागत करत, भविष्यातही अशा अवैध व्यवसायांवर सातत्याने कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.