पारोळा पोलिसांचा वाहनधारकांवर कारवाईचा बडगा.!!!

0 258

पारोळा पोलिसांचा वाहनधारकांवर कारवाईचा बडगा.!!!

पारोळा प्रतिनिधी :-

पारोळा – येथील पोलिस ठाण्याचे नूतन कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी रस्त्यांवर बेशिस्त पार्किंग दुचाकी,कार चालकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.आज तब्बल १२ वाहनधारकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

महामार्गासह पोलिस ठाणे,पंचायत समिती आवार, कजगांव रोड,चोरवड रोड, बसस्थानक परीसरात

दुचाकी,कार व इतर वाहनधारक हे आपली वाहने बेशिस्त पार्किंग करून रहदारीस अडथळा निर्माण करतात.यामुळे वाहतुक कोंडीची समस्या ही उद्भवते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.१८) पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनात पोउपनिरी राजेंद्र कोठावदे व कर्मचारी यांनी बेशिस्त वाहनधारकांसह विना नंबर प्लेट,फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट,वयात नसलेले, विना लायसन्स आदींवर ठोस दंडात्मक कारवाई केली.

यावेळी पाचशे,एक हजार याप्रमाणे १२ वाहनधारकांवर जवळ्पास १० हजारांपर्यंत दंड वसुल करण्यात आला असुन त्यात दोन हजार रोख स्वरूपात तर आठ हजार रूपये कालावधीनुसार रक्कम वसुल करण्यात आली आहे.

दरम्यान महामार्गासह बाजारपेठ,कजगांव रोड, चोरवड रोडावर पाणीपुरी, पालेभाज्या,फळ विक्रेते आदींना वेळोवेळी समज देण्यात आली होती.तरी दुर्लक्ष होत असल्याने एका पाणीपुरी व्यावसायिकावर गुन्हा दाखल करत दंड वसुल करण्यात आला.दरम्यान सातत्य व होणाऱ्या दंडात्मक कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये पार्किंग बाबत शिस्त दिसुन येत आहे.तर विशेषतः वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होत नसल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!