लखीचंद भाऊंकडून सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप – “ते आमच्यासाठी फक्त नेते नाहीत, तर खरे भाऊ आहेत.!!!

0 205

लखीचंद भाऊंकडून सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप – “ते आमच्यासाठी फक्त नेते नाहीत, तर खरे भाऊ आहेत.!!!

भडगाव (प्रतिनिधी) –

स्व. बापूजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भडगाव नगरपरिषदेचे लोकप्रिय माजी नगरसेवक लखीचंद पाटील यांनी आपल्या कन्या श्री हिच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवला. पावसाळ्यात अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या नगरपरिषदेच्या सफाई कामगार, पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.

हा उपक्रम त्यांच्या सुरक्षेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमात अनेक कर्मचारी, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कर्मचाऱ्यांनी कृतज्ञतेने भावना व्यक्त करत म्हटले, “लखीचंद भाऊ हे केवळ राजकारणी नाहीत, तर आमच्या सुखदु:खात खंबीरपणे साथ देणारे खरे भाऊ आहेत.”

या वेळी बोलताना लखीचंद पाटील म्हणाले, “वाढदिवस साजरा करताना जर काही समाजोपयोगी करता आलं, तर त्यासारखा आनंद दुसरा नाही. ‘जिथे कमी, तिथे आम्ही’ ही आमची कार्यनिती आहे.”

कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पार पडला, मात्र त्यामागचा सामाजिक संदेश प्रत्येकाच्या मनाला भिडणारा ठरला – “सेवेत असलेल्या हातांना सन्मानाचं आभाळछत्र मिळावं, हाच आमचा छोटा प्रयत्न.”

या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब जिभू पाटील, समन्वय समितीचे युवराज आबा पाटील, माजी नगराध्यक्ष गणेशआण्णा परदेशी, डॉ. प्रमोद पाटील, तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, समाधान पाटील, इम्रान अली सय्यद, आबा चौधरी, जग्गू भोई, जितू आचारी, देवा आहिरे, महेंद्र ततार, पिंटू मराठे, निलेश पाटील (युवासेना), चंद्रकांत वाघ, दिलीप भोई, विनोद भोई, तेजस पाटील, वाल्मिक पवार यांच्यासह शिवसेना व फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशनच्या संचालक व सदस्यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!