चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद ; दोन दिवसांची कोठडी.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – येथे नगरपरिषद परिसरातील शिव प्रोव्हिजन येथून काही दिवसांपूर्वी रात्रीस टाटा मिठाचा गोणी चोरीस गेल्या होत्या.
याप्रकरणी दोन आरोपींना पोलीसांनी आज अटक केली आहे.त्यांना आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शिव प्रोव्हिजन येथून सोळा हजार आठशे रुपयांचा बारा टाटा मिठाचा गोणी रात्रीस चोरीस गेल्या होत्या. याबाबत शंकर बागनमल सिंधी यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती.गुन्ह्याचा तपास हे. कॉ.संजय पवार,अजय बाविस्कर हे करीत असताना, तपासात मिळालेल्या संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रसारीत करण्यात आले.गोपनीय माहितीवरून राजू पंडित बच्छाव व रमेश जाधव उगरेच्छा,दोघे राहणार श्रद्धा नगर,गलवाडे रोड,अंमळनेर यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबूली दिली.पोलिसांनी त्यांना अटक करून मिठाचा गोणी ही जप्त केल्या.त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.सदर माल फिर्यादीस सुपूर्द केल्याने व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले.