भडगाव तहसील कार्यालयात जप्त वाहनांची गर्दी; नागरिकांना मोठा त्रास.!!!

0 709

भडगाव तहसील कार्यालयात जप्त वाहनांची गर्दी; नागरिकांना मोठा त्रास.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तहसील कार्यालयाच्या परिसरात जप्त केलेल्या वाहनांची प्रचंड गर्दी निर्माण झाली असून, त्यामुळे शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.

विशेषतः वाळू तस्करीप्रकरणी जप्त करण्यात आलेली ट्रॅक्टर, ट्रक, डंपर आदी वाहने तहसील कार्यालयाच्या आवारातच उभी करण्यात आली आहेत. यामुळे संजय गांधी योजना कार्यालय, पुरवठा विभाग, महसूल शाखा यांसारख्या महत्वाच्या कार्यालयांकडे जाणारे रस्ते अडथळ्यामुळे अरुंद झाले आहेत.

नागरिकांची गैरसोय:

शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहनतळ उपलब्ध नसल्यानं आपली दुचाकी अथवा चारचाकी लावण्यासाठी जागा मिळत नाही. इतकेच नव्हे तर काही वेळा शासकीय वाहनांनाही पार्किंगसाठी जागा मिळत नाही. परिणामी, नागरिक आणि कर्मचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे.

अस्वच्छतेचा विळखा:

या परिसरात उभ्या असलेल्या जप्त वाहनांमुळे स्वच्छतेचा अभावही जाणवत असून, डास व घाण यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रशासनाकडे मागणी

या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जप्त वाहने लवकरात लवकर इतरत्र हलवून कार्यालयीन परिसर मोकळा करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. तहसील प्रशासनाने या वाहनांचे योग्य व्यवस्थापन करून नागरिकांना होणाऱ्या त्रासातून दिलासा द्यावा, असेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!