पिंप्री,टोळी शिवारात गावठी हातभट्टींवर छापा.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – तालुक्यातील पिंप्री प्र.अ.व टोळी शिवारात आज गावठी दारूच्या हातभट्टींवर पारोळा पोलिसांनी छापा टाकला.त्यात एक लाख वीस हजार पाचशे रुपयांचे कच्चे रसायनसह मुद्देमाल जप्त करून तो नष्ट केला.
याप्रकरणी आबा पोपट भिल (५४) व अलकाबाई भगवान बोरसे (४६) दोघेही रा.पिंप्री प्र.उ.ता.पारोळा यांच्यावर दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कारवाई पारोळा पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनात हवलदार योगेश शिंदेसह कर्मचाऱ्यांनी केली.