लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे गुरुपौर्णिमा निमित्त माता पिता पूजन सोहळा संपन्न.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त माता पिता पूजनाचा सोहळा संपन्न झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. शाळेतील चिमुकल्यांनी आपल्या माता व पितांचे औक्षण केले. पालकांनी शाळेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे सर यांनी अध्यक्षीय भाषणात गुरुचा सन्मान करणे, आई-वडिलांनी सांगितलेली शिकवण आत्मसात करणे. चांगल्या सवयी आत्मसात करणे. मेहनतीने यश संपादन करणे. व जे जे चांगले आहे ते स्वीकारणे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
पालकांमधून श्री सचिन सोमवंशी यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन श्रीमती अनिता सैंदाणे तर फलक लेखन श्री अनंत हिरे यांनी केले. मनस्वी महाजन या चिमुकल्या विद्यार्थिनीने गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला.शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.