युनिवर्सल इंटरनॅशल पोदार स्कुलमध्ये “सीड्स बॉल” निर्मिती कार्यशाळा(विद्यार्थ्यांमार्फत ५०० सीड्स बॉल्स तयार करून रोपण).!!!
युनिवर्सल इंटरनॅशल पोदार स्कुलमध्ये “सीड्स बॉल” निर्मिती कार्यशाळा(विद्यार्थ्यांमार्फत ५०० सीड्स बॉल्स तयार करून रोपण).!!!
पारोळा प्रतिनिधी :-
येथे सीडबॉल्स कॅम्पेन उपक्रमांतर्गत युनिवर्सल इंटरनॅशल पोदार स्कुल येथे “सीड्स बॉल” निर्मिती कार्यशाळेचे आयोजन केले होते.त्यात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
रोजच्या वापरातील फळ आणि उपयुक्त झाडांच्या देशी बिया विद्यार्थ्यांनी जमा केल्या होत्या.त्या बिया एकत्र करून कार्यशाळेत सीड्स बॉल्स निर्मिती कशी करावी यावर प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांमार्फत ५०० सीड्स बॉल्स तयार करून शाळेच्या परिसरातच त्यांचे रोपण करण्यात आले.
सीडबॉल्स कॅम्पेन समन्वयक राहुल निकम यांनी विद्यार्थ्यांना सीड्स बॉल्स निर्मिती कशी करावी,रोपं कसे करावे याबाबत प्रात्यक्षिक दाखविले.
उपप्राचार्य मोरे यांनी सीड्स बॉल तसेच पर्यावरण रक्षणासाठी झाडे किती महत्वाची आहेत यावर मार्गदर्शन केले.