भडगाव तालुक्यातील रोडरोमिओंवर ‘दामिनी पथक’कडून कारवाई,शाळा, महाविद्यालय, क्लासेस व बसस्थानक परिसरात विशेष लक्ष

0 88

भडगाव तालुक्यातील रोडरोमिओंवर ‘दामिनी पथक’कडून कारवाई,शाळा, महाविद्यालय, क्लासेस व बसस्थानक परिसरात विशेष लक्ष

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत टवाळखोरी करणाऱ्या रोडरोमिओंवर लगाम घालण्यासाठी ‘दामिनी पथक’ सक्रिय झाले आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. माहेश्वर रेड्डी (सो.), जळगाव, मा. अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर (सो.), चाळीसगाव परिमंडळ आणि पोलीस निरीक्षक श्री. पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे.

तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, क्लासेस आणि बसस्थानक परिसरात विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांवर नजर ठेवण्यासाठी आणि विद्यार्थिनींना सुरक्षिततेचा अनुभव देण्यासाठी ‘दामिनी पथक’ कार्यरत झाले आहे.

या पथकात महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकार, मपोहेकाँ ४५० शमीना पठाण, मपोहेकाँ २६७० पंचशिला निकम, मपोकाँ १८५१ सोनी सपकाळे, मपोकाँ २५३७ नर्गीस पठाण, मपोकाँ १३८४ वैशाली मराठे, पोकाँ १९३२ प्रवीण परदेशी व पोकाँ ३४८५ गौरव चौधरी यांचा समावेश आहे.

पथकाने भडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल, सौ. सुमनताई गिरधर पाटील माध्यमिक विद्यालय, लाडकुबाई विद्यामंदिर, आदर्श कन्या शाळा तसेच बसस्थानक परिसराला भेट देत शिक्षकवृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना ‘गुड टच – बॅड टच’, QR कोडवर ऑनलाइन तक्रार कशी करावी, डायल 112 सारख्या आपत्कालीन सेवांबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी परिसरात विनाकारण फिरणाऱ्या ५ टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई करत ‘महाप्रसाद’ दिला. भविष्यात असे प्रकार पुन्हा आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!