रांजणगाव येथील हरिभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा व जनजागृती कार्यक्रम.!!!
चाळीसगाव प्रतिनिधी :-
रांजणगाव येथील हरिभाऊ चव्हाण माध्यमिक विद्यालयात आज चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे प्रमुख एपीआय श्री. शंकर महादेव मुटेकर यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा व जनजागृतीविषयक कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची सुरक्षितता, व्यसनमुक्ती, वाहतुकीचे नियम, पॉक्सो अॅक्ट, सोशल मीडियाचा वापर यांसारख्या विषयांवर श्री. मुटेकर साहेबांनी अत्यंत मोलाचे आणि समर्पक मार्गदर्शन केले. जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी व चाळीसगावच्या अॅडिशनल एसपी सौ. कविता नेरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.
श्री. मुटेकर साहेबांनी विद्यार्थ्यांना स्वतःची काळजी कशी घ्यावी, वाहतुकीचे नियम कसे पाळावेत, गुड टच व बॅड टच याबाबत जागरूकता दिली. सोशल मीडियाचा योग्य व सावध वापर, त्याचे फायदे व तोटे याबाबतही विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळाली.
शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणती काळजी घ्यावी याविषयी देखील त्यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणतीही अडचण भासल्यास ग्रामीण पोलिस स्टेशनशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमास सुमारे ४०० विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच श्री. प्रमोद चव्हाण यांनी देखील गुटखा, तंबाखू, सिगारेटसारख्या व्यसनांचे दुष्परिणाम सांगत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. एम. बागल सर, पर्यवेक्षक श्री. व्ही. बी. पाटील सर, शिक्षक श्री. व्ही. टी. पाटील सर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एच. आर. गोराने सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. व्ही. टी. पाटील सर यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारीवर्ग तसेच ग्रामीण पोलिस स्टेशनचे श्री. नितीन सोनवणे व श्री. संदीप पाटील उपस्थित होते.