मतदारसंघाचा विकासाचे व्हिजनला प्रत्यक्षात सुरुवात.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – एरंडोल विधानसभा मतदारसंघाचा विकासाचे व्हिजन जनतेसमोर मांडून विकास साधणार असल्याचे आमदार अमोल पाटील यांनी आश्वासित केले होते,त्यास आता प्रत्यक्षात सुरुवात
झाली असुन स्थानिक आमदार निधी कार्यक्रमांतर्गत पारोळा तालुक्यात मंजूर १ कोटी रुपयांचा विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते शनिवारी पार पडला.याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील,जि.प.मा.कृषि सभापती डॉ.दिनकर पाटील, शेतकी संघाचे मा.अध्यक्ष चतुर पाटील,डॉ.राजेंद्र पाटील,शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील,देवगांव सरपंंच समिर पाटील,शेतकी संघाचे संचालक सुधाकर पाटील,भैय्यासाहेब पाटील, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष सखाराम चौधरी,मा.संचालक राजेंद्र पाटील,दासभाऊ पाटील,लोणिसिम सरपंच डॉ. कैलास पाटील,मा. उपसभापती डॉ.पी.के. पाटील,जोगलखेडा मा. सरपंच अनिल पाटील, करमाड मा.सरपंंच दिलीप पाटील,सरपंच सुशिल पाटील,करमाड सरपंच शरद पवार,तरडी उपसरपंच अंकुश पवार,आडगांव सरपंच महेश मोरे,मुंदाणे सरपंच एकनाथ पाटील आदी मान्यवरांसह पदाधिकारी,शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान या विकासकामांची मोठी मागणी हि ग्रामस्थांकडून वेळोवेळी होत होती,हि कामे मंजूर करून पूर्ण करण्याचे ठोस आश्वासन जनतेला दिल्याने आज प्रत्यक्ष त्याची पूर्ती होतांना मनस्वी समाधान होत असल्याचे आमदार अमोल पाटील यांनी यावेळी सांगितले.दरम्यान एरंडोल तालुक्यातील पद्मालय साठवण तलाव-२ उपसा सिंचन योजना प्रकल्पाचा द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावाचा १०७२.४५ कोटी रुपयांना मंजुरी मिळवून आणली.तर विविध विकासकामे व लहान- मोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे ते म्हणाले.
या कामांचे झाले भूमिपूजन
मौजे तरडी सभामंडप बांधकाम करणे १५ लक्ष,
मौजे शेवगे प्र.ब.येथे श्री मारोती मंदिराजवळ सभामंडप बांधकाम २० लक्ष, मौजे तामसवाडी येथे श्री गणपती मंदिराजवळ सभामंडप बांधकाम २० लक्ष,
मौजे करमाड बु.येथे शिवस्मारक परिसर सुशोभीकरण ५ लक्ष,मौजे रताळे येथे संरक्षण भिंत बांधकाम १५ लक्ष अशी एकुण ७५ लक्ष रुपयांची विकासकामे आहेत.