आषाढी एकादशी सोहळा उत्सवात साजरा,विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.!!!

0 65

आषाढी एकादशी सोहळा उत्सवात साजरा,विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.!!!

भडगाव ता प्रतिनिधी आमिन पिंजारी

कजगाव ता.भडगाव येथील स्टेशन रोड वरील विठ्ठल रुख्मिनी मंदिर देवस्थानात दर वर्षा प्रमाणे या वर्षी देखी आषाढि एकादशी सोहळा साजरा करण्यात आला कजगाव चे सरपंच रघुनाथ महाजन व उद्योजक भुषण शिनकर यांचे हस्ते सपत्नी पुजा करण्यात आली प्रसंगी भाविक मोठया संख्येने उपस्थित होते पंचक्रोशीतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आराध्यदैवत विठ्ठल परमात्मा यांचा उस्तव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कजगाव येथे प्रति पंढरपुर म्हणुन नावारूपाला आलेले भव्य असे मंदिर व स्वयंभू अशा विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती वारकऱ्यांचे श्रद्धास्थान बनले आहे आषाढ एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात सकाळी ५.३०वाजता काकडा आरती ६वाजता महाअभिषेक(जलाभिषेक)७वाजता महाआरती ८वाजता पताका रोहन कलश पूजन पंडितजी रामेश्वर पांडेजी यांचे हस्ते करण्यात आले १२वाजता मध्यान आरती १२.३० वाजता केळी वाटप करण्यात आली सायंकाळी सांज महा आरती व रात्री भजन या प्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भाविकांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेतला दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्या नंतर देखील दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!