टायगर स्कूलमध्ये माऊली… माऊली… विठ्ठल नामाचा गज
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून विठ्ठल-रुख्मिणीची आकर्षक झांकी सादर केली. वारकरी वेशात विद्यार्थ्यांनी भजन, अभंग, श्लोक म्हणत रंगतदार दिंडी काढली.
“माऊली… माऊली… पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” च्या गजराने व लेझीमच्या तालावर संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. या दिंडीत प्ले ग्रुप ते इयत्ता सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या प्रसंगी शाळेचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमात शाळेच्या संचालिका रुपाली पाटील, प्राचार्य पी.एस. पाटील, अजीम शेख, उपप्राचार्य कविता सूर्यवंशी, विभागप्रमुख नम्रता बेडीस्कर, वृषाली पाटील आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.i